बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मंगळवारी झालेल्या मतमोजणीनंतर आमदार दिलीप सोपल यांचे पुतणे तथा माजी नगराध्यक्ष योगेश सोपल हे उक्कडगाव गणातून तर भाजपाचे नेते राजेंद्र मिरगणे हे शेळगाव आर गणातून पराभूत झाले. या निवडणुकीत राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीला ९, आ. दिलीप सोपल यांच्या शेतकºयांची बाजार समिती वाचवा आघाडीला ७ तर राजेंद्र मिरगणे यांच्या शेतकरी विकास आघाडीला केवळ २ जागा मिळाला. सत्ता स्थापनेसाठी १० सदस्यांची आवश्यकता असल्याने बाजार समितीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता शासकीय धान्य गोदामात मतमोजणीस सुरुवात झाली. सर्वप्रथम हमाल/तोलार मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये सोपल यांच्या आघाडीचे चंद्रकांत सदाशिव मांजरे हे २९१ मते घेत विजयी झाले. त्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर होत गेले. यामध्ये सुरुवातीला शेतकरी गणातील १५ जागांमध्ये ८ जागांवर सोपल गटाचे तर ७ जागांवर राऊत गटाचे उमेदवार पुढे होते. तिसºया फेरीपर्यंत हा कल कायम होता. मात्र त्यानंतर भालगाव, घाणेगाव या दोन गणात राऊत गटाचे उमेदवार सोपल गटाच्या उमेदवारांच्या पुढे गेले आणि अंतिम क्षणी राजेंद्र राऊत गटाचे उमेदवार ९ गणात आघाडीवर राहिले तर ६ गणात सोपल गटाचे उमेदवार पुढे राहिले.
शेवटच्या क्षणी उपळे दुमाला, आगळगाव व शेळगाव (आर) या तिन्ही गणातील उमेदवारांच्या मतांमध्ये अल्पसा फरक असल्याने कोण निवडून येईल, याविषयी अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे नेते व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. यात शेळगावातील तिरंगी लढतीत राऊत गटाचे वासुदेव गायकवाड यांनी सोपल गटाचे कपिल कोरके यांचा ६९ मतांनी पराभव केला तर उपळे दुमालामध्ये सोपल गटाचे अनिल जाधव यांनी १२ मतांनी सचिन बुरगुटे यांचा पराभव केला तर आगळगावमध्ये सोपल गटाचे अभिमन्यू डमरे यांनी राऊत गटाचे गणेश डमरे यांचा १४ मतांनी पराभव केल्याने राऊत ९, सोपल ७ तर राजेंद्र मिरगणे २ असे निकालाचे अंतिम चित्र कायम राहिले. घाणेगाव गणातील लढतीकडेही सर्वांचे लक्ष होते.
यात दोन्ही उमेदवार घाणेगावातीलच होते. यामध्ये राऊत गटाचे उमेदवार झुंबर जाधव यांनी सोपल गटाचे नेते तथा जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन नितीन मोरे यांचा ११२ मतांनी पराभव करुन विजय मिळविला. सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असलेल्या पांगरी गणामध्ये राजेंद्र राऊत गटाच्या शालन विजय गोडसे यांनी सोपल गटाच्या नेत्या व राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंदाकिनी शिवाजीराव काळे यांचा १३३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीसाठी झालेल्या एकूण ६१ हजार ५५५ मतांपैकी १८ गणांतून १ हजार १२५ मते अवैध ठरविण्यात आली.
निकाल जाहीर होताच राऊत गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी करुन गुलालाची मुक्तपणे उधळण केली. विजयी उमेदवार तसेच माजी आ. राजेंद्र राऊत, विश्वास बारबोले, संतोष निंबाळकर, कुंडलिकराव गायकवाड, रमेश पाटील, अरुण बारबोले, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी आदींसह नेतेमंडळींना खांद्यावर घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शासकीय गोडावूनपासून मिरवणुकीद्वारे हा ताफा वाजतगाजत बाजारात दाखल झाल्यानंतर विजयी सभा झाली.
आजपर्यंत या शासनाने शेतकºयांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यात विशेषत: राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा हक्क मिळवून दिल्यामुळे या निवडणुकीत आमच्या बाजूने शेतकºयांनी कौल दिलेला आहे. माझ्याकडे खासगी बाजार समिती असली तरी दोन्हींचा समन्वय साधून शेतकरी, व्यापाºयांच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही काम करु़ याबरोबरच युवकांसाठी या बाजार समितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून, मराठवाड्यात ज्याप्रमाणे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते, तशीच या तालुक्यातही सुुरु झाल्याने सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार आहे़ गेल्या १0 वर्षात तालुका पंचायत समिती काठावर आमच्या ताब्यात आली होती. त्याप्रमाणेच बाजार समिती काठावर आल्याने दोघांच्या पाठीशी कार्यकर्ते जिवंत असल्याचे दिसून आले. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमधील या निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ते मिटले नसल्यामुळे काही गण आमच्या हातून जाऊन तेथे आमचा उमेदवार पराभूत झाला़ मी आणि राजेंद्र मिरगणे एकाच पक्षात आहोत़ आमच्या दोघात समेट घडविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र त्याच काळात ते परदेश दौºयावर गेल्याने तो विषय तसाच रेंगाळला़ आता बार्शी बाजार समितीबाबत काय करायचे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो आम्हाला मान्य राहील़ -राजेंद्र राऊत, प्रमुख, बळीराजा विकास आघाडी
योगेश सोपल मामांकडून पराभूत
- उक्कडगाव गणातून राऊत गटाचे रावसाहेब मनगिरे यांनी २ हजार २८३ मते घेत आ. सोपल यांचे पुतणे तथा माजी नगराध्यक्ष योगेश सोपल यांचा ४०३ मतांची आघाडी घेत पराभव केला. त्यामुळे नात्याने मामा-भाच्यात झालेल्या या लढतीत भाच्याला मामा वरचढ ठरले, असे म्हणावे लागेल. यापूर्वी नगरपालिका निवडणुकीत योगेश सोपल यांच्याकडून रावसाहेब मनगिरे यांचा पराभव झाला होता़ तर आज योगेश सोपल हे रावसाहेब मनगिरे यांच्याकडून पराभूत झाले़
आजपर्यंत या शासनाने शेतकºयांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यात विशेषत: राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकºयांना मतदानाचा हक्क मिळवून दिल्यामुळे या निवडणुकीत आमच्या बाजूने शेतकºयांनी कौल दिलेला आहे. माझ्याकडे खासगी बाजार समिती असली तरी दोन्हींचा समन्वय साधून शेतकरी, व्यापाºयांच्या अडचणी लक्षात घेऊन आम्ही काम करु़ याबरोबरच युवकांसाठी या बाजार समितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असून, मराठवाड्यात ज्याप्रमाणे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते, तशीच या तालुक्यातही सुुरु झाल्याने सोयाबीनला योग्य भाव मिळण्यासाठी त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटून प्रयत्न करणार आहे़ गेल्या १0 वर्षात तालुका पंचायत समिती काठावर आमच्या ताब्यात आली होती. त्याप्रमाणेच बाजार समिती काठावर आल्याने दोघांच्या पाठीशी कार्यकर्ते जिवंत असल्याचे दिसून आले. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमधील या निवडणुकीपूर्वी अंतर्गत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ते मिटले नसल्यामुळे काही गण आमच्या हातून जाऊन तेथे आमचा उमेदवार पराभूत झाला़ मी आणि राजेंद्र मिरगणे एकाच पक्षात आहोत़ आमच्या दोघात समेट घडविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मात्र त्याच काळात ते परदेश दौºयावर गेल्याने तो विषय तसाच रेंगाळला़ आता बार्शी बाजार समितीबाबत काय करायचे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, तो आम्हाला मान्य राहील़ -राजेंद्र राऊत, प्रमुख, बळीराजा विकास आघाडी
या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे़ निवडणुकीत जे कार्यकर्ते मनापासून झटले व कष्ट घेतले, ते कष्ट पुढील काळात वाया जाऊ देणार नाही़ निवडणुकीत सहकार्य करणाºया सर्वांचे आभार. -आ़ दिलीप सोपल,
प्रमुख, शेतकºयांची बाजार समिती बार्शी तालुक्यातील शेतकºयांनी माझ्यावर प्रेम केलेले आहे. त्यांच्यासाठी माझी कामे चालूच राहतील. बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडीचा पराभव हा पैसा आणि गुंडगिरीच्या राजकारणामुळे झाला आहे. या दुष्टचक्रातून तालुक्याला बाहेर काढू. वर्षानुवर्षीची सत्ता उलथवून टाकून व्यापारी मतदारसंघातून दोन उमेदवार शेतकरी विकास आघाडीचे निवडून आले आहेत. बाजार समितीमध्ये भविष्यात कोणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत भावी राजकारणाची दिशा लक्षात घेऊन निर्णय घेऊ. आता सध्या कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.-राजेंद्र मिरगणे, प्रमुख, बार्शी तालुका शेतकरी विकास आघाडी
बाजार समितीमध्ये विरोधकांची सत्ता आली असली तरी आम्ही त्यांना कुठेही भ्रष्टाचार करु देणार नाही़ त्यांच्या कारभारावर आमचे पूर्णपणे लक्ष राहणार आहे़ त्यांनी विनाकारण कोणाला त्रास दिला किंवा देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ज्यांना त्रास होईल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू़ निवडणुकीसाठी झटलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभाऱ- सुधीर सोपल, राष्ट्रवादी काँग्रेस
रणवीर राऊत विक्रमी १२१५ मतांनी विजयी- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जामगाव गणातून माजी आ. राजेंद्र राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत हे ४ हजार ८८१ मतांपैकी तब्बल २ हजार ९६४ मते घेऊन १ हजार २१५ मतांच्या आघाडीने विजयी झाले. त्यांनी सोपल गटाचे माजी नगराध्यक्ष गणेश जाधव यांचा पराभव केला.
मिरगणे तिसºया स्थानी ४केवळ हमाल/तोलार, अडते/व्यापारी व शेळगाव (आर) गणात तिरंगी लढत होती. शेळगाव (आर) तिरंगी लढतीत राऊत गटाचे वासुदेव गायकवाड यांनी १ हजार ६१८ मते घेत विजयी झाले. सोपल गटाचे कपिल कोरके यांना १ हजार ५४९ मते मिळाली. तिसºया क्रमांकावर फेकल्या गेलेल्या राजेंद्र मिरगणे यांना १ हजार २१४ इतकी मते मिळाली.
मतमोजणीवेळी राऊत कुटुंबीय ठाण मांडूनच्मतमोजणी सुरु असताना लक्षवेधी लढत असलेल्या जामगाव गणातील उमेदवार रणवीर राऊत व माजी नगराध्यक्ष गणेश जाधव हे एकमेकांशी हसत-खेळत बोलत व खेळीमेळीत मतमोजणीचा आनंद घेत होते़ तर स्वत: राजेंद्र राऊत, विजय राऊत व रणजित राऊत ,अभिजित राऊत हे राऊत कुटुंबातील सदस्य मतमोजणी सुरु झाल्यापासून संपेपर्यंत ठाण मांडून बसले होते़
मनमोकळीक गप्पाच्याचबरोबर दिवसभर उपस्थित असलेल्या राजेंद्र राऊत यांनी मनात कोणताही आकस न ठेवता सोपल गटाचे प्रमुख कार्यकर्ते तसेच भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारुन राजकारण हे निवडणुकीपुरते असते आणि एकदा निवडणूक झाल्यावर मनात काय नसते हे सांगत सर्वांनी शांतपणे आपल्या घरी जावे हे कार्यकर्त्यांना त्यांनी आवर्जून सांगितले़