माढा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा समर्थ बूथ अभियान मेळावा कुर्डूवाडी येथील श्रीराम हॉलमध्ये पार पडला. यावेळी ते बोलत होते. खासदार निंबाळकर पुढे म्हणाले, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले. राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ प्रचाराला होते. परंतु भाजपच्या बुथ पातळीवरील व शक्ती केंद्राच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या योग्य कामामुळे भाजपाचा उमेदवार निवडून आला. ते यश फक्त कार्यकर्त्यांमुळे प्राप्त झाले. आता माढा व करमाळा मतदारसंघातील आमदार बदलण्यासाठी बूथ सक्षम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अंबुरे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे, भाजपा भटक्या जमाती जिल्हाध्यक्षा माया माने, महिला जिल्हा सचिव वंदना पंत, युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या कुंभेजकर, सुधीर गाडेकर, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष उमेश पाटील, नागनाथ कदम, प्रा रवींद्र ननवरे, योगेश पाटील, दिनेश शिंदे, दत्तात्रय मोरे, राजश्री शेंडगे आदी उपस्थित होते.
-----
कुर्डूवाडी येथे भाजपच्या बूथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख तालुकास्तरीय मेळाव्यात बोलताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर.