शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

गवताला फवारण्यासाठी पाणी आणयला गेला, तीन तास मोटारी लावून विहिरीतून मृतदेह काढला

By काशिनाथ वाघमारे | Published: July 30, 2023 9:27 PM

ग्रामस्थ धावले : खैराट येथे पाण्यात बुढून तरुण शेतक-याचा मृत्यू

सोलापूर : गवताला फवारायला पाणी आणायला शेतातील विहिरीत उतरलेला शेतमजूर तरुण पाय घसरुन पाण्यात बुढाला. ग्रामस्थांनी तीन विद्युत मोटारी लावून तीन तास पाण्याचा उपसा केला आणि मृतदेह बाहेर निघाला.

परशुराम उर्फ प्रशांत नारायण पात्रे (वय २७) या असे पाण्यात बुढून मरण पावलेल्या शेत मजुराचे नाव असून ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता खैराट (ता.अक्कलकोट) येथे ही घटना घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत उत्तर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.हा तरुण एका शेतक-याकडे गवताला औषध फवारणीसाठी गेला होता. त्यासाठी पाणी लागणार होते. हे पाणी आणायला जवळच्या विहिरीत उतरला. मात्र अचानकपणे पाय घसरून तो विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुढाला.

याची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल अंगद गीते, नामदेव माने, बिरुदेव वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्रीच्या वेळी शवविच्छेदनासाठी मृतदेह अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली, बहीण असा परिवार आहे. मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यासाठी राम पात्रे, श्रीकांत गायकवाड, कल्याणी गायकवाड, सायबणा गायकवाड, अमोल गायकवाड, पोलीस पाटील राजकुमार सोनकांबळे, शिवशरण गायकवाड, मलेशा तोळणूरे या ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

पोलिसांनी आणलेल्या आकड्याला लागला गळाला...ही विहीर पाण्याने तुडूंब भरलेली होती. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून ३ एचपी, ७ एच पी, ५ एच पीच्या तीन विद्युत मोटारी लावून पाण्याचा उपसा केला. सात तास मोटारी चालल्या तेंव्हा कुठे दहा फूट पाणी कमी झाले. त्यानंतर वागदरी दुरक्षेत्राच्या पोलिसांनी येताना लोखंडी आकडा आणला. त्याच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह निदर्शनास येताच मल्लेशा तोळणूरे यांनी आरडाओरडा केला.

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूर