याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंदार दहावी शिक्षणानंतर औद्योगिक प्रशिक्षणाचे शिक्षण घेऊन पुणे येथे नोकरीस होता. दोन- तीन दिवसांकरिता गावी आला होता. त्यामुळे आपल्या कुटुंबासमवेत नांदणी (ता. बार्शी) येथे नातेवाईकाकडे द्राक्ष खाण्यासाठी गेला होता. सायंकाळी सर्वजण द्राक्ष खाऊन वैराग येथे घरी परतले. घरी आल्यावर मंदार यास मळमळ होवून उलटीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यास तत्काळ बार्शी येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी हलवले. दरम्यान, उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बार्शी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी शीतल बोपलकर यांनी शवविच्छेदन केले.
या घटनेची नोंद बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली असून गुन्हा वैराग पोलीस ठाण्याला वर्ग केल्याचे येथील पोलीस माळी यांनी सांगितले. तर अद्याप वैराग पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग झाला नसल्याचे वैरागचे ठाणे अंमलदार शेख यांनी सांगितले. मयत मंदार याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे.
-----
काय म्हणाले वैद्यकीय अधीक्षक
उलटीचा जास्त त्रास झाला. तसेच जास्त द्राक्ष सेवन केले व ती स्वच्छ केलेली नसावीत. रासायनिक फवारणी केलेली असावी. त्यामुळे द्राक्षावरील रासायनिक औषधाचा ओव्हरडोस झाला असावा. त्यामुळे विषबाधेने मृत्यू झाल्याचे बार्शी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक शीतल बोलकरांनी भ्रमणध्वनीवरून लोकमतला सांगितले.
----