शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

कोर्टातून केस काढत नसल्याने सलगर येथे तरुणाचा निर्घुन खून

By काशिनाथ वाघमारे | Published: May 06, 2024 9:02 PM

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न..

सोलापूर: कोर्टात चालू असलेली केस मागे न घेतल्याचा राग मनात धरून सलगर (ता. अक्कलकोट) येथील एका तरुणाचा दगड व लोखंडी पाइपने मारून निर्घृण खून करण्यात आला. भीमाशंकर श्रीकांत पोलासे (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून सोमवार, ६ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अक्कलकाेट उत्तर पोलिस ठाण्यात उमेश मलप्पा पोलासे, सुरेश मलप्पा पोलासे, मलप्पा गणपती पोलासे (सर्व रा. सलगर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी सलगर शिवारात श्रीमंत पाटील यांच्या शेताजवळून जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर आरोपी संगनमत करून आले. आमच्याविरुद्ध तुम्ही केलेली केस काढून घ्या, आम्हाला त्रास होत आहे, केस काढून नाही घेतली तर तुला अन्यथा तुझ्या मुलाला जिवे मारतो, असा दम त्याच्या वडिलास आरोपींनी दिला होता.

कोर्टातून केस काढून न घेतल्याचा राग मनात धरून फिर्यादीचा मुलगा भीमाशंकर यास दगडाने आणि लोखंडी पाइपाने मारून गंभीर जखमी करून जिवे मारले. याबाबत मयताचे वडील श्रीकांत गणपती पोलासे (वय ५८) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पाेलिस निरीक्षक बागाव हे करीत आहेत. 

वर्षभरापूर्वी झाले होते लग्न..मयत भीमाशंकरचे वर्षाभरापूर्वी लग्न झाले होते. तिची पत्नी गरोदर आहे. तो घरातून शेताकडे म्हशीची धार काढण्यासाठी भाऊ धोंडप्पाला सोबत घेऊन निघाला होता. शेतात गेल्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी कामात गुंतले. याची संधी साधत आरोपींनी त्याच्यावर खुनी हल्ला चढवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी