आप्पासाहेब पाटील, सोलापूर : वडिलांसोबत तक्रार चालू असताना तक्रार का करता असे विचारले म्हणून भांडण सोडविण्यासाठी गेले असता तू आमच्या मध्ये का पडतो म्हणून दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास शासकीय रूग्णालयात नोंद झाली.
जितेंद्र बाबासाहेब सरवदे (वय ३५, रा. मुडवी, ता. मंगळवेढा) असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ ऑगस्ट २०२३ रोजी घराजवळील देवळा जवळ दहा वाजण्याच्या सुमारास वडिलांसोबत तक्रार चालू असताना तक्रार का करता असे म्हणून सोडविण्यासाठी जितेंद्र सरवदे हा गेला असता त्यास तू आमच्या मध्ये का पडतो म्हणून त्यास सिद्धार्थ सुभाष सरवदे व सुभाष सरवदे या दोघांनी काठीने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत डोक्यास गंभीर जखमी झाल्याने जितेंद्र यास उपचारासाठी खासगी रूग्णालय, मंगळवेढा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यास २९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शासकीय रूग्णालयात वडील बाबासाहेब सरवदे यांनी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना ३० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉ. किरण जमखंडी यांनी सिव्हिल चौकीला कळविले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.