तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू; अजित पवार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 12:58 PM2021-05-12T12:58:51+5:302021-05-12T12:59:41+5:30

भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी ?

Your performance starts out pretty useless; Ajit Pawar lashed out at the District Collector of Solapur | तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू; अजित पवार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू; अजित पवार सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

googlenewsNext

सोलापूर - सोलापूरच्या पाणीप्रश्नाबाबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यावर जोरदार  निशाणा साधला. तुमची कामगिरी एकदम बेकार सुरू आहे. भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटींवरून १३० कोटींवर गेलीच कशी, याची चौकशी करा. मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त, महापौर यांची एक समिती करून अहवाल पाठवा. आम्ही निधी उपलब्ध करून देऊ, असेही अजित पवार म्हणाले. 

उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या प्रलंबित कामांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी मुंबईतून व्हीसीद्वारे बैठक घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी संचालक त्रिंबक ढेंगळे-पाटील, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक महेश कोठे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, किसन जाधव आदींनी या बैठकीत सहभाग नोंदविला.

समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनाची नुकसानभरपाई ५५ कोटी निश्चित केली होती. मात्र माढ्यातील राजकीय नेत्यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन वाढवून घेतले. आता ही रक्कम १३० कोटी रुपयांवर गेली आहे. मूल्यांकन कसे वाढले याची चौकशी करावी, असे आदेश अजितदादांनी दिले. जिल्हाधिकाऱ्यांबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लवकरच अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याचे सांगण्यात आले. 

 

Web Title: Your performance starts out pretty useless; Ajit Pawar lashed out at the District Collector of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.