अक्कलकोट : युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच महागाईच्या विरोधात राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. याचाच एक भाग म्हणून प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली.
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रथमेश म्हेत्रे व अक्कलकोट युवक काँग्रेस अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा मार्गदर्शनाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. महिला काँग्रेस शहराध्यक्ष सुनीता हडलगी यांनी प्रथम स्वाक्षरी केली. अक्कलकोट बस स्थानक व पेट्रोल पंप या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. या वेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पेट्रोल, डिझेल आणि गॅस महागाईवर नियंत्रण नाही. नियंत्रण न आल्यास युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या प्रसंगी नगरसेवक विकास मोरे, वसीम कुरेशी, अयाज चंदनवाले, सुनील खवळे, शिवशरण इचगे, जगदीश माळी, आकाश निंगदल्ली, संदीप नवले, बसवराज अल्लोली, कुपेंद्र अरेनवरू, वसीम बागवान, मुद्दसर शेख, मल्लिनाथ दिंडुरे, सतीश कोळी, धनराज येळमेली, एम.जी. शेख, सतीश चिंचोळी आदी उपस्थित होते.
:::::::::
फोटो : १३ अक्कलकोट
अक्कलकोटमध्ये महागाईविरोधात युवक काँग्रेसने मोदी सरकारविरोधात घोषणा देत स्वाक्षरी मोहीम राबविली.