शीतलकुमार कांबळेसोलापूर : जुनी पेन्शन लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचा-यांची वेतन त्रुटी दुर करा, कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत सामावून घ्या या प्रमुख माणीसह इतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटना मंगळवार १४ मार्चपासून संपावर जाणार आहेत. कर्मचारी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य गट ड (चतुर्थ श्रेणी ) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ समन्वय समितीने मंगळवार १४ मार्च २०२३ पासून बेमुदत संपात पुकारला आहे. सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर, महानगरपालीका, नगरपालीका, नगरपरिषदा, नगरपंचायती कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी हे राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार आहेत. या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व महासंघाच्या संलग्ण असलेल्या प्रवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, लिपिक वर्गीक कर्मचारी, लेखा कर्मचारी संघटना, अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, वाहनचालक संघटना, कृषि तांत्रिक, नर्सेस संघटना, आरोग्य कर्मचारी युनियन, आंगणवाडी पर्यवेक्षिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक, पशुचिकित्सा व्यवसायीक, जि.प. महिला परिचर, हात पंप / विद्युत यांत्रिक कर्मचारी, कुष्ठरोग कर्मचारी, विस्तार अधिकारी (सां / पं / आयआरडीपी/ समाजकल्याण / आरोग्य) औषध निर्माण अधिकारी, जि.प. प्रशासन अधिकारी संघटना या २१ प्रवर्ग संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, पदवीधर कर्मचारी संघटनेतील सदस्य संपात सहभागी होणार आहे.
संपात सहभागी होत असले बाबतची नोटीस महासंघा मार्फत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व शासनाला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महासंघाच्या बार्शी, करमाळा, सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा मोहोळ, कुडूवाडी, माळशिरस तालुका शाखेकडून संबधित तालुक्याचे. तहसिलदार व गट विकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.