शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

जिल्हा परिषदेचा कारभार ठप्प!

By admin | Published: June 07, 2014 1:11 AM

फायली निकाली निघेनात: एकाच अधिकाऱ्यावर अनेक खाती अवलंबून

सोलापूर: जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा खुळखुळा झाला असून, प्रमुख पदावर नामधारी अधिकारी आहेत. कोणत्याही फाईलवर सहजासहजी निर्णय होत नसल्याची अडचण अनेक अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.सीईओ तुकाराम कासार यांच्या कारभारावर पदाधिकारी थेट नाराजी व्यक्त करीत होते. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, तत्कालीन पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे व दिलीप सोपल यांच्यासोबतच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या ढिम्म कारभाराच्या तक्रारी मांडल्या होत्या. पालकमंत्र्यांनीही सुधारणा करा, असे सांगितल्यानंतरही कासार यांनी फार काही बदल केला नव्हता. त्यातच कासार यांची बदली झाली अन् श्वेता सिंघल या सीईओ म्हणून रुजू झाल्या. आता कामाला वेग येईल, असे वाटत होते. परंतु काहीच बदल झाला नाही. पारदर्शकता व कामाचा वेग वाढण्याऐवजी संपूर्ण कारभार ढेपाळला आहे. शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्याची १५ फेब्रुवारी २०१४ रोजी सुरू झालेली फाईल अद्याप निकाली निघाली नाही. कारभार ढेपाळण्यास सीईओ, अतिरिक्त सीईओ, प्रकल्प संचालक पदावरील व्यक्तीच कारणीभूत आहेत. हणमंत मुळूक हे सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील वर्षभर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपद रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचा पदभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव सांभाळत आहेत. वर्षभरात हे पद भरलेच नाही. अतिरिक्त सीईओ तानाजी गुरव ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पदभार बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे. --------------------------------शासन लोकाभिमुख होणार कसे?शासन लोकाभिमुख होण्यासाठी अधिकाऱ्यांनी गावात मुक्कामाला जावे, असा आदेश शासनाने काढला आहे. सीईओ, खातेप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करुन गावकऱ्यांच्या अडचणी मार्गी लावाव्यात, ही शासनाची अपेक्षा आहे. परंतु सोलापूर जिल्हा परिषदेला शासनाच्या आदेशाचा विसर पडला आहे. सीईओ, अतिरिक्त सीईओ व खातेप्रमुख खेड्यापाड्यात जाण्यास तयार नाहीत तर शासन लोकाभिमुख होणार का?, असा प्रश्न आहे.-------------------------‘सीईओ’ची बैठकांना दांडीसीईओ दर्जाच्या अधिकाऱ्याला सतत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्तांच्या बैठकांना जावे लागते. सीईओ सिंघल या रुजू झाल्यापासून या बैठकीला जात नाहीत. कधी अतिरिक्त सीईओ, कधी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सीईओंचे प्रतिनिधी म्हणून जातात.