सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी स. ना. भंडारकर यांनी बुधवारी जारी केले आहेत.
कोरोना साथीच्या कारणामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दिवाळीपर्यंत पुढे ढकलण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शासनाकडे केला होता, त्यावर ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या खराच असे आदेश दिले आहेत. शिक्षकांच्या बदल याबाबत शासनाने १५ जुलै रोजी परिपत्रक काढले होते़ या परिपत्रकानुसार जिल्हा अंतर्गत बदली यांचे कारवाई करताना समुपदेशन वेळी इच्छुक शिक्षकांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणली गेली होती, या अनुषंगाने आता नव्याने अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे संभाव्य गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने कोणाचीही तक्रार येणार नाही याची खबरदारी घेऊन तसेच कोरोना हा तिच्या अनुषंगाने घालण्यात आलेल्या फिजिकल डिस्टन्स व इतर सूचनांचे पालन करून शिक्षकांच्या जिल्हांतर्गत विनंती बदल्या द्या शिक्षणाद्वारे करण्यात याव्यात व शिक्षकां च्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत तसेच जिल्ह्यांतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांचे रिक्त पदांच्या समानीकरण संदर्भातील शासनाचे आदेश कटाक्षाने पाळण्यात यावेत़ या बदल्या आॅनलाईन पद्धतीने करावयाची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात यावी असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना आता न्याय मिळणार आहे़