Ulefone नं ही कंपनीनं आपल्या दणकट आणि हटके स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कंपनीनं आता भक्कम Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 10000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला गेला आहे. हा फोन इतका मजबूत आहे कि आपटल्यावर देखील याला काही होणार नाही. MIL-STD – 810G मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशनसह येणारा हा डिवाइस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.
Ulefone Power Armor 14 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते. हा स्मार्टफोन प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करतो. सोबत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात, सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 20MP चा आहे. सोबत 2MP चा मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनमध्ये 10000mAh ची बॅटरीदेण्यात आली आहे. जी 18W वायर्ड चार्ज आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Ulefone Power Armor 14 Pro ची किंमत
हा स्मार्टफोन मार्चच्या अखेरीस जागतिक बाजारात लाँच केला जाईल. Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनची किंमत 399.99 डॉलर (सुमारे 30,650 रुपये) आहे.
हे देखील वाचा: