Realme 9 4G स्मार्टफोन गेल्या आठवड्यात भारतीयांच्या भेटीला आला आहे. कंपनीनं हा फोन 90Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरी, अशा फीचर्ससह लाँच केला आहे. परंतु याची सर्वात मोठी खासियत यातील 108MP चा कॅमेरा आहे. हा फोन आज पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर Realme 9 4G ची विक्री करण्यात येईल.
Realme 9 4G ची किंमत
Realme 9 4G स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होईल, जी 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 18,999 रुपये मोजावे लागतील. फोनचे सनबर्स्ट गोल्ड, स्टारगेज व्हाईट आणि मेटीऑर ब्लॅक असे तीन कलर व्हेरिएंट विकत घेता येतील. HDFC बँक क्रेडिट व डेबिट कार्ड आणि SBI बँक क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.
Realme 9 4G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 9 4G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. पंच होल डिजाईनसह येणारी ही स्क्रीन 1000नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. तसेच कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Realme 9 4G मधील कॅमेरा सेगमेंट खूप महत्वाचा आहे. कंपनीनं 108MP चा Samsung ISOCELL HM6 सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून दिला आहे. त्याचबरोबर सुपर वाईड लेन्स आणि मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
रियलमी 9 4जी स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. फोन मधील 8GB पर्यंतचा रॅम 13GB पर्यंत व्हॅच्युअली वाढवता येतो. सोबत 128GB इंटरनल मेमरी मिळते. मोबाईल Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. Realme 9 4G स्मार्टफोनमधील 5000mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.