Samsung नं काही दिवसांपूर्वी आपला 108MP कॅमेरा असेलला एक स्मार्टफोन मिड रेंजमध्ये Galaxy A33 5G नावानं सादर केला आहे. आता कंपनीच्या एम सीरिजमध्ये देखील जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. कोणताही गाजावाजा न करता 108MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy M53 5G लाँच झाला आहे.
कंपनीनं सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी ची किंमत किंवा हा फोन कधीपासून विकत घेता येईल, याची माहिती दिली नाही. हा फोन कधी आणि कोणत्या देशांमध्ये उपलब्ध होईल, याची माहिती लवकरच मिळू शकते. सध्या फक्त हा डिवाइस सर्व फीचर्ससह Samsung Mobile Press या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिसला आहे. या मोबाईलच्या बॉक्समध्ये चार्जर मात्र मिळणार नाही.
Samsung Galaxy M53 5G चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy M53 5G चा कॅमेरा सेगमेंट खूप महत्वाचा आहे. मागे क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचाच डेप्थ सेन्सर मिळतो. फोनच्या फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर कंपनीनं दिला आहे.
सॅमसंग एम53 5जी मध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह मिळतो. फोन अँड्रॉइड 12 बेस्ड One UI 4.1 वर चालतो. यातील चिपसेटचं समजलं नाही पण ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं 1TB पर्यंत वाढवता येते. बेसिक कनेक्टिव्हिटीसह साईड फिंगरप्रिंटची सुरक्षा मिळते. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळते.