Xiaomi सध्या आपल्या Xiaomi 12 सीरिजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं Xiaomi 12s सीरिज टीज केली होती. तसेच Xiaomi 12 Ultra आणि Xiaomi 12 Lite 5G लवकरच बाजारात लाँच होऊ शकतात. टिपस्टर Evan Blass नं यातील Xiaomi 12 Lite 5G स्मार्टफोनचे ऑफिशियल रेंडर्स शेयर केले आहेत. यातून फोनच्या कलर व्हेरिएंट्स सोबतच डिजाइनची माहिती मिळाली आहे.
अशी असेल डिजाईन
रेंडर्सनुसार हा फोन सेंटर-पंच होल असलेल्या डिस्प्लेसह बाजारात येईल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो, कारण साईड माउंटेड स्कॅनर दिसत नाही. आगामी शाओमीस्मार्टफोन फ्लॅट एज डिजाइनसह बाजारात येईल. उजव्या पॅनलवर पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर मिळेल.
फोनच्या टॉप पॅनलवर मायक्रोफोन, स्पिकर ग्रिल आणि IR ब्लास्टर मिळेल. तर बॉटमला स्पिकर ग्रिल, यूएसबी टाइप-C पोर्ट, मायक्रोफोन आणि सिम स्लॉट असेल. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा असू शकतो. टिपस्टरनुसार Xiaomi 12 Lite 5G फोन ग्रीन, ब्लॅक आणि पिंककलर ऑप्शनमध्ये येईल.
संभाव्य स्पेसिफिकेशन
फोनमध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी यात स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजची जोड मिळू शकते. 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स असेल. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळेल. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी 67 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.