Motorola ने आपल्या जी सीरिजचा विस्तार सुरूच ठेवला आहे. बजेट सेगमेंटमध्ये मोटो जी पॉवर (2022) सादर केल्यानंतर कंपनीने आता नवीन स्मार्टफोन Moto G200 5G नावाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला आहे. हा स्मार्टफोन 144Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888+ चिपसेट, 8GB RAM आणि 108MP Camera अशा स्पेसिफिकेशन्ससह युरोपियन बाजारात आला आहे.
Moto G200 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाने हा स्मार्टफोन 6.8 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच होत डिस्प्ले 144हर्ट्ज रिफ्रेश रेट, HDR10 आणि DCI-P3 colour gamut ला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे यात ऑक्टकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 ओएस असेलेल्या या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Moto G200 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे.
Moto G200 5G Phone मध्ये IP52 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स मिळतो. तसेच सुरक्षेसाठी यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर मिळतो. यात 5G सह अन्य बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी हा मोटोरोला फोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
Moto G200 5G Phone ची किंमत
मोटोरोला जी200 5जी चा एकमेव 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट युरोपात आला आहे. ज्याची किंमत 450 युरो ठेवण्यात आली आहे, जी भारतीय चलनानुसार 38,000 रुपयांच्या आसपास आहे. या फोनच्या भारतीय लाँचची मात्र अजून माहिती मिळाली नाही.