POCO ने या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन POCO F3 GT लाँच करणार असल्याची घोषणा केली आहे. लोकप्रिय Poco F1 नंतर ‘एफ सीरिज’ मध्ये भारतात लाँच होणारा हा दुसरा स्मार्टफोन असेल. त्यामुळे कंपनीचे चाहते या फोनची आतुरतेने वाट बघत आहेत. या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. आता POCO F3 GT च्या लाँचपूर्वी समजले आहे कि हा फोन 12GB रॅमसह बाजारात येईल, त्याचबरोबर POCO F3 GT ची भारतातील किंमत देखील समोर आली आहे. (Poco F3 GT gets landing page on Flipkart with all the key features)
POCO F3 GT ची भारतातील किंमत
पोको एफ3 जीटीची किंमत ट्वीटरवर गॅजेट्सडाटाने शेयर केली आहे. लीकनुसार, पोको एफ3 जीटी स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाईल. फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम + 128GB स्टोरेज असेल, तर POCO F3 GT चा दुसरा व्हेरिएंट 12GB रॅम + 256GB स्टोरेजसह येईल. यातील 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 28,999 किंवा 29,999 रुपये असेल, तर 12GB रॅम असलेला मॉडेल 31,999 किंवा 32,999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
पोको इंडिया आपला हा नवीन स्मार्टफोन 23 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच करणार आहे. हा फोन ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल. हा इव्हेंट कंपनीच्या वेबसाईट, सोशल मीडिया आणि फ्लिपकार्टवर थेट प्रक्षेपित केला जाईल.
POCO F3 GT चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाच्या फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या पोको स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात आला आहे.
POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 64MP चा सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 Gaming Edition सारखे आहेत.