iQOO ब्रँड दिवसेंदिवस मोठ्या ब्रँड्सना चांगली टक्कर देत आहे. विशेष म्हणजे इतर कंपन्या एकाच फ्लॅगशिप चिपसेटसह दोन स्मार्टफोन वेगवेगळ्या किंमतीत सादर करत नाहीत. कारण त्यामुळे महागड्या फोनला सोडून लोक स्वस्त फोनकडे वळतात. परंतु आयकूनं ती जोखीम iQOO Neo 6 लाँच करून उचलली आहे. कंपनीनं आयकू नियो 6 चीनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 64MP Camera आणि 80W फास्ट चार्जिंगसह सादर केला आहे. विशेष म्हणजे हाच शक्तिशाली चिपसेट कंपनीच्या महागड्या आयकू 9 प्रो मध्ये देखील मिळतो.
iQOO Neo 6 चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 6 लेटेस्ट अँड्रॉइड 12 आधारित ओरिजन ओएससह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यांतची UFS 3.1 storage आहे. फोन थंड ठेवण्यासाठी वीसी कूलिंग सिस्टम मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
आयकू नियो 6 मध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले आहे, जो 120हर्ट्ज रिफ्रेश आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागे ओआयएस असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी हा मोबाईल फोन 4,700एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 80वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.
iQOO Neo 6 ची किंमत
आयकू नियो 6 चे तीन व्हेरिएंट्स चीनमध्ये आले आहेत.
- 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज: 2799 युआन (सुमारे 33,500 रुपये)
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज: 2999 युआन (सुमारे 35,900 रुपये)
- 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज: 3299 युआन (सुमारे 39,500 रुपये)
हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही. जर भारतात याचं पदार्पण झालं तर वनप्लस, शाओमी, सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोला देखील चांगली टक्कर मिळेल.