न्यूयाॅर्क : ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर नवे मालक इलाॅन मस्क यांनी कंपनीमध्ये माेठे बदल केले आहेत. आता ते आणखी एक माेठे पाऊल उचलणार आहेत. ट्विटरवरील काेट्यवधी खाती ते हटविणार आहेत.
मस्क यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १५० काेटी म्हणजेच सुमारे दीड अब्ज खाती हटविण्यात येणार आहे. ही सर्व खाती केवळ नावापुरतीच आहे. अनेक वर्षांपासून त्यात लाॅगइन झालेले नाही आणि काेणतेही ट्वीटही करण्यात आलेले नाही, असे मस्क यांनी ट्वीटमधून सांगितले.
एवढ्या माेठ्या संख्येने निष्क्रिय खाती हटविल्यामुळे नेम स्पेस माेकळी हाेईल. एखाद्याला एक विशिष्ट युझरनेम हवे आहेत. मात्र, ते काेणी आधीच घेतलेले आहे आणि त्याचा वापरच हाेत नाही. असे खाते हटविल्यामुळे ते नाव उपलब्ध हाेईल.