Android Virus: Dr. Web अँटी-व्हायरस या फर्मनं एका मोठ्या मालवेयर अटॅकचा शोध लावला आहे. ज्यात Huawei अॅप गॅलरीच्या मधील 190 अॅप्समध्ये एक Trojan व्हायरस आढळला आहे. जवळपास 9.3 मिलियन म्हणजे 93 लाख वेळा हे अॅप्स इंस्टॉल करण्यात आले आहेत. या युजर्सची खाजगी माहिती हॅकर्सच्या हाती लागू शकते. फर्मच्या रिपोर्टनंतर Huawei नं हे अॅप्स आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत.
Huawei नं हे धोकादायक अॅप्स काढून टाकले असले तरी ज्या युजर्सच्या स्मार्टफोन्समध्ये हे अॅप्स इन्स्टॉल आहेत त्यांचा डेटा मात्र अजूनही असुरक्षित आहे. तसेच हुवावे हे अॅप्स यातील त्रुटी दूर करून पुन्हा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करणार आहे, असे कंपनीनं एका विधानात सांगितलं आहे.
कोणते अॅप्स आहेत धोकादायक
या व्हायरसने प्रभावित झालेल्या अॅप्समध्ये Hurry up and hide यादीत सर्वात वर आहे. कारण हा अॅप वीस लाख लोकांनी इन्स्टॉल केला आहे. तसेच Cat adventures चे 4,27,00 डाउनलोड्स आहेत. तर, Dirve School simulator चा वापर 1,42,00 पेक्षा जास्त लोक करत आहेत. हॅकर्स गेमिंग आणि यूटिलिटी अॅप्सचा वापर करून युजर्सना लक्ष्य करत आहेत.
Dr. Web सिक्योरिटीनुसार, या Trojan व्हायरसचे मूळ Android.Cynos.7.origin मध्ये सापडते, जो बदलून Cynos प्रोग्राम मॉड्यूलसाठी तयार केला गेला आहे. हॅकर्स याच्या माध्यमातून Android अॅप्स इंटिग्रेट करून पैसे मिळवत आहेत. हा व्हायरस 2014 पासून युजर्सची पैसे लुटत आहे. रिपोर्टनुसार, यातील काही मालवेयर मोठ्या प्रमाणावर डिवाइसवरून प्रीमियम SMS पाठवत आहेत. तसेच, युजरचा फोन अॅक्सेस करून फोन कॉल्स देखील मॅनेज करत आहेत. भारतात मात्र Huawei AppGallery वापरता येत नाही, त्यामुळे भारतीयांना वरील अॅप्सचा धोका कमी आहे. असं जरी असलं तरी थर्ड पार्टी अॅप स्टोरवरून इन्स्टॉल केलेल्या अॅप्समध्ये या ऍप्सचा समावेश आहे का याची खात्री करून घ्या.