Realme च्या ‘वी’ सीरिजचा एक स्टायलिश स्मार्टफोन गेले कित्येक दिवस चर्चेत होता. आज अखेरीस कंपनीनं Realme V25 5G Phone चीनमध्ये लाँच केला गेला आहे. यात 120Hz display, 64MP Camera, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या फोनच्या जागतिक लाँचची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
Realme V25 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme V25 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल पॅनल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा नवीन रियलमी अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. फोनमधील डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजी रॅम 19 जीबी पर्यंत वाढवण्यास मदत करते.
फोटोग्राफीसाठी रियलमी वी25 5जी फोनच्या ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी, साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि रंग बदलणारा बॅक पॅनल देखील यात देण्यात आला आहे. हा मोबाईल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.
Realme V25 5G ची किंमत
रियलमी वी25 5जी फोनच्या एकमेव 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 1999 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 24,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Morning Star green, Purple MSI आणि Sky Black कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा: