शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
4
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
5
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
6
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
7
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
8
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
9
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
10
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
11
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
12
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
13
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
14
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
15
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
16
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
17
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
18
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
19
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...

MG Motors च्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च; पाहा, किंमत आणि डिटेल्स

By देवेश फडके | Published: February 08, 2021 2:15 PM

MG Motors कंपनीच्या ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले.

ठळक मुद्देMG ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन लॉन्च८ वर्षाच्या बॅटरी वॉरंटीसह दोन पर्यायांमध्ये उपलब्धनवीन बॅटरी क्षमतेमुळे अधिक कि.मी. अंतर कापू शकणार

नवी दिल्ली : अगदी कमी कालावधीत भारतीय बाजारपेठेत जम बसवलेल्या MG Motors कंपनीने आपल्या ZS EV या इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन भारतात लॉन्च केले आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन अपग्रेडेट व्हर्जन ०८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले. (2021 MG ZS EV launch in India) 

एमजी मोटर्सच्या ZS EV इलेक्ट्रिक कारची स्पर्धा ह्युंदाई कोना, टाटा नेक्सॉन इव्ही, टाटा टियागो इव्ही या गाड्यांशी असणार आहे. एकदा चार्ज केल्यावर ZS EV इलेक्ट्रिक कार ३४० कि.मी.चे अंतर जाऊ शकते. मात्र, नवीन व्हर्जनमध्ये क्षमता वाढवण्यात आल्यामुळे आता ही इलेक्ट्रिक कार ४१९ कि.मी. अंतर कापू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारला भारतीय बाजारपेठेत उत्तम प्रतिसाद मिळाल्याने या गाडीचे अपग्रेटेड व्हर्जन लॉन्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...

MG ZS EV इलेक्ट्रिक कारची किंमत

ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जनची भारतीय बाजारपेठेतील एक्स शो-रुम किंमत २०.९९ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. संपूर्ण भारतातील ३१ शहरांमध्ये ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ZS EV इलेक्ट्रिक कारचे नवीन व्हर्जन Excite आणि Exclusive या दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध करण्यात आले असून, याची भारतीय बाजारपेठेतील एक्स शो-रुम किंमत अनुक्रमे २० लाख ९९ हजार ८०० रुपये आणि २४ लाख १८ हजार रुपये आहे. तसेच या गाडीच्या बॅटरीला आठ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. 

MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार

MG ZS EV इलेक्ट्रिक कारचे फिचर्स

MG ZS EV इलेक्ट्रिक कारच्या नवीन व्हर्जनमध्ये iSmart EV 2.0 टेक्नोलॉजी, पॅनरॉमिक सनरुफ, टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम विथ अँड्राइड-अॅपल कारप्ले कनेक्टेड, हिटेड ओआरव्हिएम यांसारखे अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. यासह सुरक्षेसाठी या गाडीत सहा एयरबॅग्स, HDC, HSA, ABS आणि EBD सारखे स्टँडर्ड फिचर्स देण्यात आले आहेत. ZS EV मधील बॅटरी 15A होम सॉकेट आणि DC फास्ट चार्जरनेसुद्धा चार्ज केली जाऊ शकते.  तसेच अवघ्या ५० मिनिटांत ही कार चार्ज होऊ शकेल, असा दावा केला जात आहे.

टॅग्स :MG Motersएमजी मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनIndiaभारत