ब्लूटूथ इयरफोन्सचा कानात स्फोट झाल्यामुळे एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानमधील उदयपुरा गावात घडली आहे. मृत तरुणाचे नाव राकेश नगर असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे. या तरुणाचा मृत्यू स्फोटानंतर आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यामुळे झालेचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हे इयरफोन्स कोणत्या कंपनीचे होते किंवा स्फोट का झाला याची माहिती मात्र मिळालेली नाही. (Bluetooth earphones blast in Rajasthan)
ब्लूटूथ इयरफोन्स वापरून राकेश फोन वरती बोलत होता. अचानक या इयरफोन्सचा स्फोट झाला, त्यामुळे तरुण बेशुद्ध पडला. त्वरित राकेशला सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला. राकेशचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हा अटॅक इयरफोन्सचा स्फोट झाल्यानंतर आला होता. या स्फोटामुळे राकेशचे दोन्ही कान जखमी झाले होते. वायरलेस इयरफोन्सचा स्फोट होण्याची ही देशातील पहिली घटना आहे.
नुकत्याच लाँच झालेल्या OnePlus Nord 2 5G चा स्फोट
ही घटना बंगळुरूची असल्याचे सांगितले जात आहे. एक महिलेने तिच्या बॅगमध्ये OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन ठेवला होता. त्याचा स्फोट झाला आहे. या फोनचे फोटो काढून वनप्लसला टॅग करत तक्रार करण्यात आली आहे. अंकुर शर्मा नावाच्या युजरने ट्विट केले होते. ते आता डिलीट करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, महिलेने पाच दिवस आधीच OnePlus Nord 2 5G खरेदी केला होता. रविवारी हा फोन पर्समध्ये ठेवून सायकलने ती बाजारात जात होती. तेव्हा अचानक स्फोट झाला. फोनला अचानक आग लागली आणि धूर निघू लागला.