नवी दिल्ली : आज इंटरनेटचे जग इतके मोठे झाले आहे की, त्यावर तुम्ही काहीही सर्च करू शकता. जर आपण गुगल सर्चबद्दल (Google Search) बोललो, तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येथून मिळेल. आपण येथे काही सर्च करू शकता. पण गुगलवर (Google) काहीही सर्च करणे, तुम्हाला महागात पडू शकते.
आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया या 3 गोष्टींबद्दल, ज्यामुळे तुम्हाला आजच गुगलवर सर्च करणे बंद करावे लागेल.
1) चाइल्ड पॉर्नोग्राफीतुम्ही गुगलवर चाइल्ड पॉर्नोग्राफी सर्च केल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते. भारतात सरकारने याबाबत कठोर कायदा केला आहे, ज्यामुळे तुम्ही पॉस्को कायद्यांतर्गत तुरुंगाची हवा खाऊ शकता. गुगलवर असे सर्च करताना पकडले गेल्यास 5 ते 7 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
2) बॉम्ब कसा बनवायचा? हा देखील एक संवेदनशील मुद्दा आहे. तुम्ही चुकूनही बॉम्ब कसा बनवायचा, हे गुगलवर सर्च केले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते आणि तुम्ही सुरक्षा एजन्सीच्या रडारखाली येऊ शकता. तसेच तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
3) अबॉर्शनजर तुम्ही गुगलवर गर्भपाताशी (अबॉर्शन) संबंधित माहिती शोधत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. यासाठी भारत सरकारने कडक कायदे केले आहेत. डॉक्टरांच्या परवानगीनंतरच हे शक्य आहे. त्यामुळे गुगलवर असे काहीही सर्च करू नका