नवी दिल्ली - मोबाईल हरवल्यामुळं आपल्याला अनेक अडचणींना सामेर जावं लागते. महत्त्वाचे संपर्क क्रमांक, बरीचशी गोपनीय माहिती, छायाचित्रे आणि बऱ्याच उपयुक्त गोष्टी गमावण्याची वेळ स्मार्टफोन गमावल्यामुळे येते. त्यातही पुन्हा नवीन फोन घेण्याची कटकट आहेच..पण आता स्मार्टफोन त्यातही अँड्रॉइडवाला असेल आणि तो हरवल्यास काळजी करायची गरज नाही. अशा काही ट्रिक्स अस्तित्वात आहेत ज्यामुळे तुमचा फोन लगेच शोधू शकाल.
एंटी थेफ्ट अलार्म - याला तुम्हा आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करा आणि तुम्ही त्याला एक्टिव्हेट करा. एक्टिव्हेट केल्यानंतर जर तुमच्या फोनला कोणी अनोळखी व्यक्तीनं हात लावला तर मोबाईलमधील अलार्म वाजेल. त्यामुळं तुम्ही गर्दीमध्ये असाल आणि कोणी तुमचा फोन चोरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लगेच समजेल.
लुकआऊट सिक्युरिटी अॅण्ड एन्टिवायरस - या अॅपमध्ये गुगल मॅपच्या मदतीने हरवलेल्या फोनच्या लोकेशनची माहिती समजेल. फोन चोरणाऱ्यांनी जल तो स्विच ऑफ केला असेल तर शेवटचे लोकेशन समजेल. यामुळं तुमचा फोन शोधनं सोपे होईल.
थीफ ट्रॅकर - चोरी झालेला फोन शोधण्यासाठी या अॅपचा वापर होतो. फोन चोरी करणाऱ्या व्यक्तीची सर्व माहिती या अॅपच्या मदतीने आपल्याला मिळेते. त्यासाठी यामध्ये एक खास फिचर तयार करण्यात आलं आहे. जर तुमच्या मोबईलचा वापर कोण करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचा फोटो क्लिक करुन लोकेशनसह ते पाठवले जाईल.