नवी दिल्ली : मेक इन इंडिया धोरणातून स्टार्टअप कंपनीने फक्त 4999 रुपयांत 32 इंचाचा स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही लाँच करून महागडे टीव्ही विकणाऱ्या कंपन्यांची झोप उडविली आहे. महत्वाचे म्हणजे या टीव्हीचे सर्वाधिक सुटे भाग भारतातच बनविले आहेत.
सॅमी इन्फॉर्मेटिक्स असे या कंपनीचे नाव असून संचालक अविनाश मेहता यांनी सांगितले की, आम्ही या टीव्हीला 'वॉच एव्हरिथिंग इन एचडी' या थिमवर लाँच केले आहे, या टीव्हीच्या स्क्रीनचे रिझोल्युशन 768 पिक्सल आहे. यामुळे स्क्रीनवर व्हिडिओ एकदम स्पष्ट दिसतो. या टीव्हीवर तुम्ही सिनेमा, टीव्ही शो पाहण्यासोबतच वेबपेज ब्राऊझिंगसह अँड्रॉईड गेम खेळू शकणार आहात.
या टीव्हीमध्ये स्क्रीन मिरर, इनबिल्ट वाय-फाय, साऊंड ब्लास्टरसारखे काही खास फिचर देण्यात आले आहेत. या टीव्हीला 3 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. यामध्ये 4 जीबी रॅम, 512 एमबी स्टोरेज देण्यात आले आहे. शिवाय दोन युएसबी पोर्ट, दोन एचडीएमआय पोर्ट आणि व्हिजीए पोर्ट देण्यात आले आहे.
या टीव्हीवर फेसबूक, युट्यूब सारखे अॅप प्री इन्स्टॉल्ड असणार असून अन्य अॅप हवे असल्यास इन्स्टॉल करता येणार आहेत.
कसा खरेदी करणार हा टीव्ही?महत्वाचे म्हणजे हा टीव्ही खरेदी करण्यासाठी एक अट ठेवण्यात आलेली आहे. यासाठी आधार कार्ड लागणार आहे. हा टीव्ही खरेदी करण्यासाठी एक अॅप कंपनीने लाँच केले आहे. या अॅपद्वारेच ऑनलाईन हा टीव्ही खरेदी करता येणार आहे. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला आहे.