itel कंपनीनं काही दिवसांपूर्वी एंट्री लेव्हल itel A49 स्मार्टफोन लाँच केला होता. आता पुन्हा एकदा कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. itel Vision 3 नवं आलेला हा फोन 5000mAh Battery, 64GB Storage आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या बजेट सेगमेंटमध्ये टेक्नोला हा स्मार्टफोन चांगली टक्कर देऊ शकतो.
स्पेसिफिकेशन्स
itel Vison 3 स्मार्टफो 6.6 इंचाचा HD+ IPS डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कंपनीनं यात Waterdrop नॉचचा वापर केला आहे. या फोनमध्ये Octa-Core प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 3 जीबी रॅम आणि 64 जीबीची मेमरी मिळते. कंपनीनं या फोनमध्ये गुगलच्या अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे.
या फोनमध्ये ड्युअल सिम 4G सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फिचर मिळतं. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागे 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, सोबत एक वीजीए सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. पावर बॅकअपयासाठी या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला स्पॉट करते.
किंमत
itel Vision 3 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनची विक्री अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात आहे फोन ऑफलाईन मार्केटमध्ये येईल. या स्मार्टफोन सोबत 100 डेज फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर दिली जात आहे.