रियलमीनं चीनमध्ये एक नवीन 5G स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता सादर केला आहे. कंपनीनं आपल्या क्यू सीरिजमध्ये Realme Q5x 5G स्मार्टफोन सादर केला आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये यात MediaTek Dimensity 700 प्रोसेसर, 4GB RAM, 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सारखे फिचर मिळतात. चला जाणून घेऊया याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Realme Q5x 5G ची किंमत
Realme Q5x 5G स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये आला आहे. या मॉडेलमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते. या व्हेरिएंटची किंमत 999 युआन आहे. ही किंमत 11,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीनं Ink Cloud Black आणि Star Blue असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. चीनच्या बाहेत Realme Q5x 5G लाँच करण्यात येईल की नाही याची माहिती मात्र मिळाली नाही.
Realme Q5x हे स्पेसिफिकेशन्स
Realme Q5x मध्ये 6.5-इंचाचा HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. टियरड्रॉप नॉच डिजाईनसह येणारी स्क्रीन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 400 निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13MP चा मुख्य कॅमेरा आणि 0.3 MP चा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा डिवाइस Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. फोनमध्ये 5G सह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. Realme Q5x मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.