Xiaomi ने आपल्या रेडमी 10 सीरिजमधील स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. Redmi 10A स्मार्टफोन MediaTek Helio G25 SoC, 5GB RAM, 5000mAh आणि 13MP कॅमेऱ्यासह भारतात आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत देखील 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. चला जाणून घेऊया Redmi 10A ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.
Redmi 10A चे स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Redmi 10A मध्ये 6.53 इंचाचा एचडी+ IPS LCD पॅनल देण्यात आला आहे. वॉटर ड्रॉप नॉच असलेला हा डिस्प्ले 400 nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन 2GHz स्पीड असलेल्या क्वॉड कोर MediaTek Helio G25 प्रोासेसरसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी पर्यांतच रॅम मिळतो सोबत 1 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे.
फोनच्या मागे 13 मेगापिक्सलचा एक एआय कॅमेरा आहे. तर फ्रॉन्टला 5 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. शाओमी रेडमी 10ए स्मार्टफोन 5000 एमएएचच्या मोठ्या बॅटरीसह कंपनीनं बाजारात आणला आहे. ही बॅटरी 10 वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह कंपनीनं यात फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा दिली आहे.
किंमत
रेडमी 10ए चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. यातील 3 जीबी रॅम आणि 32 जीबी मेमरी असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी मेमरी मॉडेलची किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन 26 एप्रिलपासून विक्रीसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अॅमेझॉनवरून विकत घेता येईल.