Xiaomi च्या Redmi 10 सीरीज अंतर्गत Redmi 10C स्मार्टफोन लाँच अधिकृतपणे लाँच झाला आहे. हा फोन सध्या नायजेरियामध्ये सादर केला आहे. ज्यात 4GB RAM, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असे स्पेक्स आहेत. लवकरच हा फोन भारतात देखील येणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार हा फोन Redmi 10 नावानं येईल, तर काही रिपोर्ट्समध्ये हा फोन Poco C4 नावानं देखील भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.
Redmi 10C चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी 10सी मध्ये 6.71 इंचाचा एलसीडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 13 वर चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, सोबत Snapdragon 680 चिपसेट मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
Redmi 10C च्या ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात फ्लॅश लाईटसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.बेसिक कनेक्टव्हिटीसह या फोनमध्ये फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सरची सिक्योरिटी मिळाली आहे. पावर बॅकअपसाठी या नवीन रेडमी फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
Xiaomi Redmi 10C ची किंमत
Redmi 10C स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेल नायजेरियामध्ये 78,000 NGN (सुमारे 14,400 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 87,000 NGN ( सुमारे 16,000 रुपये) आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा: