Realme आपल्या सी सीरिजमध्ये स्वस्त स्मार्टफोन सादर करते. कंपनी या सीरिजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. येत्या 10 फेब्रुवारीला Realme C35 नावाचा फोन सादर केला जाईल. सर्वप्रथम याची एंट्री थायलंडमध्ये होईल, त्यानंतर भारतासह जगभरात हा फोन लाँच केला जाईल. कंपनीच्या टीजरमधून Realme C35 ची डिजाईन, 50MP Camera आणि 5,000mAh battery ची माहिती मिळाली आहे.
Realme C35
Realme C35 स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच असलेल्या 6.6 इंचाच्या डिस्प्लेसह सादर केला जाईल. हा एक फुलएचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले असेल. या स्मार्टफोनच्या तिन्ही बाजूंना बेजल दिसत आहेत तसेच तळाला रुंद चिन देखील आहे. स्मार्टफोनच्या मागे चौरसाकृती ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये दोन मोठे तर एक छोटा सेन्सर मिळेल.
रियलमी सी35 च्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा एक सेन्सर असेल. फोनच्या उजवीकडे फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल तर डाव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे. टीजरमधील डिवाइसमधील UNISOC T616 चिपसेटची माहिती मिळाली आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचच्या बॅटरीचा वापर केला जाईल. या फोनची किंमत किती असेल हे 10 फेब्रुवारीच्या लाँचनंतरच सांगता येईल.
हे देखील वाचा:
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट