Vivo ने आपल्या ‘वाय’ सीरिजमधील नवीन स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये सादर केला आहे. हा फोन Vivo Y21s नावाने सादर करण्यात आला आहे. हा बजेट फोन 5000mAh battery, Helio G80 chipset, 4GB + 1GB RAM आणि 50MP रियर कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. इंडोनेशियन बाजारात या फोनची किंमत IDR 2,799,000 (अंदाजे 14,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाऊ शकतो.
Vivo Y21s चे स्पेसिफिकेशन्स
विवोचा नवीन फोन 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने ऑक्टकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट दिला आहे. हा फोन 4GB +1GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा अँड्रॉइड 11 ओएस आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी विवो वाय21एस मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. या फोनमधील फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचची बॅटरी मिळते. इंडोनिशियन मार्केटमध्ये विवो वाय21एस Pearl White आणि Midnight Blue कलरमध्ये विकत घेता येईल.