Vivo ने मंगळवारी देशात ‘वाय’ सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन Vivo Y73 लाँच केला आहे. 20,990 रुपये किंमत असलेल्या या फोनमध्ये 11GB RAM, MediaTek Helio G95 चिपसेट, 64MP कॅमेरा आणि 33W 4,000mAh बॅटरी असे फीचर्स आहेत. तर, आज वीवोने आपल्या गृहमार्केटमध्ये वाय सीरीजअंतगर्त Vivo Y31s (t1 Version) नावाचा नवीन फोन लाँच केला आहे. 16,000 रुपयांच्या असपास लाँच झालेला हा फोन एक बजेट 5G स्मार्टफोन आहे. (Vivo Y31s t1 Version launched with Dimensity 700 soc 5g 5000mah)
Vivo Y31s (t1 version) चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y31s (t1 version) 5G मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियोसह 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हि वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. वीवोचा हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित ओरिजनओएस 1.0 वर चालतो. फोनमधील 4 जीबी रॅमसह 0.5जीबी वर्चुअल रॅम देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी वीवो वाय31एस (टी1 व्हर्जन) मध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या ड्युअल सिम फोनमध्ये साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Vivo Y31s (t1 version) मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y31s (t1 version) ची किंमत
चीनमध्ये Vivo Y31s (t1 version) 1399 युआनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हि किंमत भारतीय चलनात 16,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते. वीवोचा हा बजेट 5G फोन भारतात कधी दाखल होईल याची माहिती मात्र अजून समोर आली नाही.