शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

भारतात 5जी स्पीड सुसाट, रशिया-अर्जेंटिनाही मागे; डेटा स्पीडमध्ये ११५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 7:41 AM

सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर नेटवर्क आता स्थिर होऊ लागले असून, भारतीय ग्राहक ५०० एमबीपीएसपर्यंतदेखील डाऊनलोड स्पीड अनुभवत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतात ५जी सेवा सुरू होऊन जवळपास सहा महिन्यांनंतर आता ५जी स्पीडच्या बाबतीत भारताने मेक्सिको, रशिया आणि अर्जेंटिना यांसारख्या काही जी२० देशांनाही मागे टाकले आहे. इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या आशियाई देशांच्याही पुढे आहे. ‘उकला’ने जारी केलेल्या रिपोर्टनुसार ५जी सेवा सुरू केल्यापासून भारताच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सुरुवातीच्या अडथळ्यांनंतर नेटवर्क आता स्थिर होऊ लागले असून, भारतीय ग्राहक ५०० एमबीपीएसपर्यंतदेखील डाऊनलोड स्पीड अनुभवत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

११५% वाढ डेटा स्पीडमध्ये सप्टेंबर २०२२ मध्ये भारतातील सरासरी डाऊनलोड स्पीड १३.८७ एमबीपीएस होता, जानेवारी २०२३ मध्ये स्पीड ११५ टक्क्यांनी वाढून २९.८५ एमबीपीएस झाला आहे.

४९ स्थानांची झेपस्पीडटेस्टच्या जागतिक क्रमवारीतही भारताने सप्टेंबर २०२२ मधील ११८व्या क्रमांकावरून ४९ स्थानांची झेप घेतली असून, ६९व्या क्रमांकावर आला आहे.

भारतात सर्वोत्तम कामगिरी कोणाची? जानेवारी २०२३ एमबीपीएसमध्येकोलकाताजिओ : ५०६.२५दिल्ली     एअरटेल २६८.८९स्पीड रेंज (जिओ)     २४६.४९ - ५०६.२५ स्पीड रेंज (एअरटेल)     ७८.१३ - २६८.८९

देशांची क्रमवारी आणि सरासरी डाऊनलोड स्पीड (एमबीपीएसमध्ये) १     यूएई     १६१.१५ २     कतर     १५५.५१ ३     नॉर्वे     १३६.०८४     द. कोरिया     १२४.८४ ५     डेन्मार्क    ११७.८३ ६९     भारत    २९.८५

कमी ५जी रोलआउटचा व्हीआयला फटका१.८८% व्हीआय ग्राहक जिओकडे वळले १.३२% व्हीआय ग्राहक एअरटेलकडे 

व्हाेडाफाेन-आयडीयाने अद्याप ५जी सेवा सुरू केलेली नाही. कंपनीचे ग्राहक सातत्याने कमी हाेत आहेत.  सरकारने १,६०० काेटींचा दंड समभागात परिवर्तित केला आहे. तरीही ग्राहक कंपनीपासून दूर जात असल्याचे आकडेवारी सांगते.

टॅग्स :5G५जी