भारतात 4G नेटवर्क आल्यापासून भारतीयांना नेक्स्ट जेनरेशन नेटवर्कची वाट बघत आहेत. 4G नेटवर्कचा स्पीड इतका असेल तर 5G स्पीड किती असेल असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तसेच नेक्स्ट जेन नेटवर्कचा आपल्या आयुष्यावर कोणता परिणाम होईल? याचं कुतूहल देखील अनेकांना आहे. याचीच माहिती आपण आज घेणार आहोत.
भारतात 5G सर्विस यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर केली जाऊ शकते. गुरुवारी याची पहिली झलक IIT मद्रासमध्ये कम्युनिकेशन अँड आयटी मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिला 5G Call करून दाखवली आहे. 5G कॉलसह व्हिडीओ कॉल देखील करण्यात आला आहे. तत्पूर्वी टेलीकॉम कंपन्यांनी 5G टेस्टिंग केली असल्यामुळे 5G सर्विस जास्त दूर राहिली नाही.
किती असेल 5G चा स्पीड
5G नेटवर्कवर 10Gbps चा स्पीड मिळण्याची क्षमता आहे. जो 4G च्या तुलनेत 100 पट जास्त आहे. 4G नेटवर्क वर युजर्सना 100Mbps पर्यंतचा स्पीड मिळतो. काही दिवसांपूर्वी केलेल्या चाचणीत वोडाफोन आयडियानं याची झलक दाखवली आहे. कंपनीनं 5.92Gbps स्पीड मिळवला आहे. जो जियो आणि एयरटेलच्या चाचण्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. डेटा स्पीडपेक्षाही जास्त परिणाम नेटवर्कच्या लेटन्सीवर होणार आहे. त्यामुळे लोड टाइम कमी होईल.
असा होईल फायदा
5G नेटवर्कवर तुम्ही कोणताही मुव्ही फक्त 6 सेकंदात डाउनलोड करू शकाल. सध्या एक चित्रपट डाउनलोड करण्यासाठी सुमारे 7 मिनिटं लागतात. सोशल मीडियावरील कंटेंट लोड होण्याचे जवळपास 2 मिनट 20 सेकंड वाचतील. HD क्वॉलिटी मुव्ही डाउनलोड करणार असल्यास 5G मुळे जवळपास 7 मिनिटं वाचतील. मोठे गेम्स देखील कमी वेळात डाउनलोड होतील.
HighSpeedInternet.com च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत 5G नेटवर्कवर युजर्स एक दोन नव्हे तर 23 तास वाचवू शकतात. युजर्स एका महिन्यात जवळपास एक दिवस 5G नेटवर्कमुळे वाचवू शकतील. हा वेळ सोशल मीडिया ब्राउजिंग, ऑनलाइन गेमिंग, स्ट्रीमिंग म्यूजिक आणि टीव्ही शो व मुव्ही डाउनलोड करण्यासाठी वापरला जात आहे. 5G मूळे ही कामं लवकर होतील.