अँड्रॉइड मोबाईलवरील काही अॅप्समध्ये मालवेयरचा धोका असतो. असे ऍप्स तुमचा खाजगी डेटा चोरू शकतात. म्हणून अनेक युजर्स अँटी व्हायरस ऍप्स इन्स्टॉल करतात. परंतु आता काही अँटी व्हायरस ऍप्सच युजर्सच्या डेटावर डल्ला टाकत आहेत. Google Play Store वरील 6 अँटी-मालवेयर ऍप्लिकेशन्सनी 15,000 अँड्रॉइड युजर्सचा संवेदनशील डेटा चोरला आहे.
डेटा चोरीची माहिती मिळताच Google नं हे ऍप्स Play Store वरून काढून टाकले आहेत. अँटी व्हायरस अॅप्लिकेशनच्या अडून शार्कबॉट अँड्रॉइड स्टीलर सॉफ्टवेयरचा वापर हॅकर्सनं केला आहे. या मालवेयरच्या माध्यमातून युजर्सचे पासवर्ड, बँक डिटेल्स आणि अन्य खाजगी माहिती चोरली जात होती, असे चेक पॉईंट्सच्या तीन संशोधकांच्या लक्षात आलं.
Atom Clean-Booster Antivirus, Antivirus Super Cleaner, Alpha Antivirus Cleaner, Center Security Antivirus, Center Security Antivirus आणि Powerful Cleaner Antivirus अशी या अॅप्सची नावं आहेत. हे ऍप्स प्ले स्टोरवरून 15,000 पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहेत. यातील 1,000 युजर्सच्या आयपी ऍड्रेसची माहिती मिळाली आहे. या युजर्समध्ये इटली आणि युनायटेड किंग्डममधील लोकांची संख्या जास्त आहे.
चेक पॉईंटच्या रिपोर्टनुसार, ‘हा मालवेयर एक जियोफेंसिंग फीचर आणि चोरीची टेक्नॉलॉजी वापरतो, हे याचं वेगळेपण आहे. अँड्रॉइड मालवेयरमध्ये कधीच न वापरण्यात आलेलं Domain Generation Algorithm (DGA) देखील यात आढळून आलं आहे.’