शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

गेल्या 5 वर्षांत 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक, सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 6:38 PM

Anurag Thakur : सायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सायबर फसवणूक सामान्य झाली आहे. सामान्य काय, विशेष काय, कोणीही सायबर फ्रॉडचा बळी होऊ शकतो. विशेष म्हणजे सरकारी सोशल मीडिया अकाउंटही हॅकिंगपासून सुरक्षित नाहीत. याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत माहिती दिली, त्यानुसार गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची 600 हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झाली आहेत.

दरम्यान, अधिकृत ट्विटर हँडल आणि ई-मेल अकाउंट हॅक झाल्याबद्दल सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात अनुराग ठाकूर यांनी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीमने (CERT-In) दिलेल्या माहितीच्या आधारे संसदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2017 पासून आतापर्यंत अशी जवळपास 641 अकाउंट्स हॅक झाली आहेत.

लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरात अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, 2017 मध्ये एकूण 175 अकाउंट्स हॅक झाली होती, तर 2018 मध्ये या संख्येत घट होऊन 114 वर आली. तर 2019 मध्ये हॅकिंगची संख्या 61 राहिली. पण 2020 मध्ये पुन्हा हॅकिंगची संख्या 77 वर पोहोचली. याच्या एका वर्षानंतर 2021 मध्ये हॅक झालेल्या सरकारी अॅप्सची संख्या 186 वर पोहोचली. याचबरोबर, 2022 मध्ये आतापर्यंत 28 सरकारी सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेली माहितीसायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे. हे डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते. टीम नियमितपणे नवीनतम सायबर अलर्टबद्दल सल्ला जारी करते. सीईआरटी-इनने डेटाचे संरक्षण करण्यासाठी आणि फसव्या क्रियाकलाप कमी करण्यासाठी संस्था आणि युजर्ससाठी 68 सूचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAnurag Thakurअनुराग ठाकुर