TECNO Mobiles नं गेल्या काही दिवसांत भारतीय स्मार्टफोन बाजारात धुमाकूळ घातला आहे. कंपनीनं 6,299 रुपयांमध्ये TECNO POP 5 LTE आणि 8,499 रुपयांचा TECNO POP 5 Pro असे दोन भन्नाट स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यात आज टेक्नोनं TECNO POVA Neo ची भर घातली आहे. यात 6,000mAh Battery आणि 6GB RAM देण्यात आला आहे. या फोनची किंमत 12,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1,499 रुपयांचे Tecno Earbuds मोफत दिले जात आहेत.
Tecno Pova Neo चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन IPX2 सर्टिफाइड आहे त्यामुळे यावर पाण्याच्या शिंतोड्यांचा काहीही परिणाम होत नाही. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं 512जीबी पर्यंत वाढवता येते. तसेच 5 जीबी वर्चुअल रॅममुळे एकूण रॅम 11 जीबी करता येतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. सिंगल चार्जवर हा स्मार्टफोन 55 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देतो, असा दावा कंपनीनं केला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Obsidian Black, Geek Blue आणि POWEHI Black कलरमध्ये लाँच झाला आहे.
हे देखील वाचा:
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट
शरीरातील स्टॅमिना सांगणार Smartwatch; एकदा चार्ज करा आणि 16 दिवस वापरा, पाण्याखाली देखील चालणार