Tecno Mobile नं कालच आपला सर्वात पहिला 5G Phone सादर केला आहे. फीचर्स आणि किंमतीच्या बाबतीत Tecno Pova 5G निराश करत नाही. हा फोन कंपनीनं जागतिक बाजारात सादर केला आहे. परंतु भारतीय ग्राहकांसाठी देखील कंपनी दोन फोन सादर करणार आहे. यातील Spark 8 Pro अॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. तर Tecno Pova Neo च्या भारतीय लाँचची माहिती लीक झाली आहे.
Tecno Pova Neo च्या भारतीय लाँचचा एक पोस्टर ऑनलाईन लीक झाला आहे. या पोस्टरमध्ये फोनच्या स्पेक्स आणि ऑफर्सचा उल्लेख करण्यात आला आहे. हा फोन 6,000mAh battery आणि 6GB RAM सह बाजारात येईल. तसेच Tecno Pova Neo च्या खरेदीवर 1499 रुपयांचे इयरबड्स मोफत देण्यात येतील, असं पोस्टरमध्ये सांगण्यात आलं आहे. हा फोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाल्यामुळे याचे संपूर्ण स्पेक्स माहित झाले आहेत.
Tecno Pova Neo चे स्पेक्स
Tecno Pova Neo स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हायओएस 7.6 वर चालतो. हा बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणार ड्युअल सिम फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
टेक्नो पोवा नियोमध्ये 6.8 इंचाचा लार्ज एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या नवीन टेक्नो फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅश, 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
पॉवर बॅकअपसाठी नवीन टेक्नो पोवा नियो फोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ही या फोनची खासियत आहे. हा डिवाइस 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर हा फोन 3 तासांपर्यंतचा गेम टाइम देऊ शकतो, असा दावा टेक्नो मोबाईल कंपनीनं केला आहे. हा फोन नायजेरियामध्ये NGN 75,100 अर्थात 13,800 रुपयांमध्ये सादर झाला आहे.
हे देखील वाचा:
कॉल, चार्जिंग करताना स्मार्टफोन गरम होतो का? या टिप्स ठेवतील तुमचा फोन कूल