नवी दिल्लीः जर आपण एअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार आहेत. कारण 31 ऑक्टोबर ही शेवटची डेडलाइन दिली असून, त्यानंतर ज्यांनी नंबर पोर्ट केलेले नाहीत, त्यांचे नंबर बंद होणार आहेत. TRAI दिलेल्या निर्देशानुसार, जवळपास 70 मिलियन(7 कोटी) युजर्स एअरसेल नेटवर्कचा वापर करतात. आतापर्यंत 1.9 कोटी एअरसेल युजर्सनं केले नंबर पोर्टखरं तर 2018मध्ये एअरसेलनं आपल्या काही सेवा खंडित केलेल्या आहेत. त्यावेळी कंपनीजवळ 90 मिलियन(9 कोटी) युजर्स होते. TRAIच्या डेटानुसार, 28 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2019दरम्यान 19 मिलियन (1.9 कोटी) एअरसेल युजर्सनं स्वतःचे नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केलेले आहेत. पण अजूनही 7 कोटी युजर्स एअरसेल नेटवर्कचा वापर करत आहेत. वर्ष 2018मध्ये जेव्हा एअरसेलनं काही सेवा खंडित केल्या होत्या, त्यावेळी कंपनी आरकॉमशी मर्जर होणार असल्याची चर्चा होती. परंतु TRAIने त्याला मंजुरी न दिल्यानं त्या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या नाहीत. ज्यावेळी एअरसेलनं सेवा खंडित केली, त्यावेळी त्यांच्याकडे बीएसएनएलपेक्षा जास्त युजर्स होते. सोपं आहे नंबर पोर्टेबिलिटीजर आपल्याला नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करायचा असल्यास फारच सोपी पद्धत आहे. त्यासाठी पहिल्यांदा कुठल्या नेटवर्कची सेवा वापरायची आहे हे निश्चित करावं लागणार आहे. त्यानंतर मेसेजमध्ये जाऊन PORT आणि त्यासोबत करायचा असलेला एअरसेलचा मोबाइल नंबर द्यावा लागणार आहे, तोच मेसेज 1900वर पाठवावा. मेसेज 1900वर केल्यानंतर आपल्याला एक युनिक पोर्टिंग कोड मिळणार आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही नेटवर्कची सेवा घेऊ शकता. तसेच आपल्याला ऑफलाइन स्टोअरमध्ये जाऊनही नंबर पोर्ट करता येऊ शकतो.
7 कोटी एअरसेल युजर्सचे नंबर होणार बंद; 31 ऑक्टोबरची अंतिम मुदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 11:06 AM
जर आपण एअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार आहेत.
ठळक मुद्देएअरसेल आणि डिशनेटचे युजर्स आहात, तर लवकरात लवकर नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट करावे लागणार31 ऑक्टोबर ही शेवटची डेडलाइन दिली असून, त्यानंतर ज्यांनी नंबर पोर्ट केलेले नाहीत, त्यांचे नंबर बंद होणार आहेत. 28 फेब्रुवारी 2018 ते 31 ऑगस्ट 2019दरम्यान 19 मिलियन (1.9 कोटी) एअरसेल युजर्सनं स्वतःचे नंबर दुसऱ्या नेटवर्कमध्ये पोर्ट केलेले आहेत.