तरुण असो किंवा लहान मुलांची गेम खेळण्याची सवय फक्त त्यांनाच नव्हे तर मोठ्यांना देखील भारी पडते. अश्या बातम्या वारंवार जगभरातून समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यात 7 वर्षांच्या मुलाने वडिलांच्या Apple iPhone मध्ये गेम खेळताना iTunes चे बिल 1800 डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 33 हजार रुपये केले. हे बिल फेडण्यासाठी वडिलांना फॅमिली कार विकावी लागली.
ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. तिथल्या 41 वर्षीय मुहम्मद यांनी आपल्या लहान मूळ गेम खेळण्यासाठी आपला स्मार्टफोन दिला होता. मुलाने ऑनलाइन गेम खेळताना पावरअप्स विकत घेऊन इतके बिल केले कि त्यांना आपली गाडी विकावी लागली. Muhammed यांच्या 7 वर्षांच्या मुलाचे नाव Ashaz Mustasa आहे. अश्हाजने फक्त 1 तास गेम खेळून iTunes चे बिल 1800 डॉलर केले.
मुहम्मद यांनी अश्हाजला गेम खेळण्यासाठी आपला iPhone दिला होता. अश्हाज आयफोनमध्ये Dragons: Rise of Berk नावाचा गेम खेळत होता. या गेममध्ये पुढल्या लेव्हलवर जाण्यासाठी तो क्लिक करत गेला. त्याला माहिती नव्हते कि तो गेममधील टॉपअप्स विकत घेत होता. जेव्हा मुहम्मद याना लागोपाठ 29 ईमेल आले तेव्हा त्यांना या घटनेची माहिती मिळाली. सुरवातीला त्यांना आपली फसवणूक झाल्याचे वाटले परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले कि त्यांच्या मुलाने 1800 डॉलर म्हणजे अंदाजे 1,33,000 रुपयांचे टॉपअप्स विकत घेतले होते.
हे देखील वाचा: पालकांनो सावधान! ऑनलाइन गेमपासून मुलांना ठेवा दूर; 12 वर्षांच्या मुलाने चोरले 3.22 लाख रुपये
घटना समोर आल्यानंतर मुहम्मद यांनी कस्टमर केयरशी संपर्क साधला. एकदा बिल बनल्यानंतर काही करता येत नाही असे उत्तर त्यांना तिथून मिळाले. परंतु Apple कडे तक्रार केल्यानंतर त्यांना 287 डॉलरचा (21 हजार) रिफंड मिळाला. उर्वरित बिल भरण्यासाठी मुहम्मद यांना त्यांची फॅमिली कार Toyota Aygo विकावी लागली.