शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

7000mAh बॅटरी असलेला सर्वात स्वस्त फोन लाँच, 11GB RAM सह फाडू Tecno Pova 3 ची एंट्री  

By सिद्धेश जाधव | Updated: June 20, 2022 12:57 IST

Tecno Pova 3 स्मार्टफोन 6 जीबी रॅम, 50MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.

गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेला Tecno Pova 3 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा मोठी बॅटरी असलेला स्मार्टफोन बजेट फ्रेंडली किंमतीत सादर करण्यात आला आहे. फोन 7000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया Tecno Pova 3 ची किंमत आणि फीचर्स. 

Tecno Pova 3 ची किंमत 

Tecno Pova 3 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. तर टॉप एन्ड मॉडेल 6GB RAM व 128GB स्टोरेजसह येईल. Amazon वर या मोबाईलचा बेस मॉडेल 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 27 जूनला याची विक्री सुरु होतील. कंपनीनं ईको ब्लॅक आणि टेक सिल्वर असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.  

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाची FHD+ LCD स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. MediaTek Helio G88 प्रोसेसरची ताकद कंपनीनं या बजेट स्मार्टफोनला दिली आहे. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळून एकूण 11GB रॅमची ताकद देण्यात आली आहे. फोन 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येईल. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

Tecno Pova 3 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चे दोन ऑक्सिलरी सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी शूटर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर तर मिळतात परंतु सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरियो स्पीकर देखील देण्यात आले आहेत. यातील 7000mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 48 तास वापरता येते, असा दावा करण्यात आला आहे.    

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड