शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रेडमी-रियलमीला म्हणाल ‘चल...’! 7,000mAh बॅटरी आणि 6GB RAM सह ‘ही’ कंपनी आणतेय लो बजेट फोन 

By सिद्धेश जाधव | Published: March 05, 2022 12:49 PM

7000mAh Battery Phone Tecno Pova 3: आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे.

7000mAh Battery Phone Tecno Pova 3: Tecno ब्रँड अंतर्गत व्हॅल्यू स्मार्टफोन सादर केले जातात. कंपनी चांगले फीचर्स लो बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न करते. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं भारतात स्मार्टफोन्स पोर्टफोलिओचा विस्तार सुरु ठेवला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये Tecno Pova 2 स्मार्टफोन 7000mAh बॅटरीसह भारतात आला होता. आता कंपनी या फोनचा नवीन व्हर्जन सादर करणार आहे, अशी बातमी आली आहे. टेक्नो मोबाईल्सचा हा स्मार्टफोन Tecno Pova 3 नावानं लवकरच ग्राहकांच्या भेटीला येईल.  

आगामी Tecno Pova 3 स्मार्टफोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे. तिथे या फोनची लिस्टिंग Tecno LF7 या कोडनेमसह करण्यात आली आहे. कंपनीनं जरी या फोनची कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी लिस्टिंग्समधून खुलासा झाला आहे. गीकबेंचसह एफसीसीवरून देखील या मोबाईलच्या काही संभाव्य स्पेक्सची माहिती मिळाली आहे.  

Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो पोवा 3 स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 12 सह वेबसाईटवर लिस्ट झाला आहे. यात कंपनीनं मीडियाटेक हीलियो जी88 चिपसेटचा वापर प्रोसेसिंगसाठी केला आहे. हा फोन 6 जीबी रॅमसह बाजारात येतील. तसेच या टेक्नो मोबाईलमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग मिळेल. सोबत 7,000एमएएच बॅटरी देण्याची परंपरा कंपनी सुरु ठेवेल अशी अपेक्षा आहे. या फोनची डिजाईन पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. 

Tecno Pova 2 स्पेसिफिकेशन्स 

Tecno Pova 2 मध्ये 6.9-इंचाचा फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा टेक्नो स्मार्टफोन Android 11 वर आधारित HiOS 7.6 वर चालतो. 

Tecno Pova 2 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा AI फोटोग्राफी सेन्सर देण्यात आला आहे. हा फ्रंटला 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. टेक्नो पोवा 2 मध्ये 7,000mAh ची दमदार बॅटरी 18W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

 
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान