Tecno Pova 3 स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची महिपती स्वतः कंपनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून दिली आहे. टेक्नोच्या Twitter वरील पोस्टरनुसार Tecno Pova 3 स्मार्टफोन भारतात 20 जूनला लाँच केला जाईल. जागतिक बाजारात आधीच याची एंट्री झाल्यामुळे या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स आधीपासून माहित आहेत. हा 7000mAh च्या बॅटरीसह येणारा फोन आहे. ज्याची विक्री Amazon India च्या माध्यमातून केली जाईल.
Tecno Pova 3 चे स्पेसिफिकेशन्स
टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.9-इंचाची FHD+ LCD स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आली आहे. MediaTek Helio G88 प्रोसेसरची ताकद कंपनीनं या बजेट स्मार्टफोनला दिली आहे. सोबत 6GB पर्यंत रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळून एकूण 11GB रॅमची ताकद देण्यात आली आहे. फोन 128GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येईल. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.
Tecno Pova 3 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चे दोन ऑक्सिलरी सेन्सर देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये 8MP चा सेल्फी शूटर कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर तर मिळतात परंतु सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टिरियो स्पीकर देखील देण्यात आले आहेत. यातील 7000mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 48 तास वापरता येते, असा दावा करण्यात आला आहे.
Tecno Pova 3 ची किंमत
Tecno Pova 3 स्मार्टफोनची किंमत बजेट फ्रेंडली असू शकते. आगामी Pova स्मार्टफोन भारतात 12 हजार रुपयांच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो.