Samsung नं आपल्या टॅबलेट सेगमेंटचा विस्तार करतं Samsung Galaxy Tab A8 टॅब लाँच केला आहे. सध्या ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होममुळे टॅब्लेट्सची मागणी वाढली आहे. त्याचाच विचार करून कंपनीनं 4GB RAM, 128GB internal storage, 7,040mAh battery आणि 10.5-इंचाचा मोठा डिस्प्ले असलेला हा टॅबलेट सादर केला आहे.
Samsung Galaxy Tab A8 चे स्पेसिफिकेशन्स
या टॅबमधील 10.5 इंचाचा मोठा डिस्प्ले एक महत्वाची खासियत आहे. हा एक डब्ल्यूयूएक्सजीए डिस्प्ले आहे, जो 16:10 अस्पेक्ट रेशियो आणि 1920 x 1200 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा Galaxy Tab A8 अँड्रॉइड 11 ओएसवर चालतो. यात प्रोसेसिंगसाठी 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यातील चिपसेट मात्र वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळा असेल.
हा सॅमसंग टॅब LTE आणि Wi-Fi दोन्ही मॉडेल्समध्ये आला आहे. स्टोरेज आणि रॅम पाहता कंपनीनं यात तीन व्हेरिएंट्स सादर केले आहेत. बेस व्हेरिएंटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मिळते. तर 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असे अजून दोन व्हर्जन समोर आले आहेत. या व्हेरिएंट्समध्ये मेमरी 1 टीबीपर्यंत वाढवता येते.
गॅलेक्सी टॅब ए8 मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळेल. पॉवर बॅकअपसाठी यात 15वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 7,040एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy Tab A8 च्या किंमतीची किंवा भारतीय बाजारातील उपलब्धतेची माहिती मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
हे देखील वाचा:
ओप्पोनं दिली सॅमसंगला मात; कमी किंमतीत सादर केला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन
सावधान! अँड्रॉईड फोनवर या 8 चुका करत असाल तर, घोटाळेबाजांना तुम्हीच मदत करताय