जोकर मालवेयरने बाधित 8 नवीन अॅप्स गुगल प्ले स्टोरवर सापडले आहेत, अशी माहिती सायबर सिक्युरिटी फार्म क्विक हिलने दिली. हे अॅप्स 50,000 पेक्षा जास्त लोकांनी प्ले स्टोर वरून डाउनलोड केले आहेत. हा मालवेयर जाहिराती वापरत असल्याचे भासवून आणि युजर्सना पेड सर्व्हिस त्यांच्या न काळात विकत घेण्यास लावून त्यांचा डेटा चोरतो, असे क्विक हिलने सांगितले. (8 new apps infected by joker spyware downloaded by 50,000)
जोकर मालवेयरने बाधित अॅप्सची यादी:
- Auxiliary Message
- Fast Magic SMS
- Free CamScanner
- Super Message
- Element Scanner
- Go Messages
- Travel Wallpapers
- Super SMS
या अॅप्सची माहिती गुगलला देण्यात आली असून प्ले स्टोरवरून हे अॅप्स हटवण्यात आले आहेत.
जोकर मालवेयरचा जाहिरातींशी इंटरॅक्ट करत असल्याचे भासवून युजर्सचे एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिवाइसची माहिती, ओटीपी इत्यादी माहिती चोरतो. चोरलेल्या माहितीचा वापर करून हा मालवेयर युजर्सच्या न कळत प्रीमियम सर्व्हिसेसना सबस्क्राईब करतो.
अश्या अॅप्सपासून वाचण्यासाठी काही टिप्स:
- अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी रिव्युज वाचावे
- डेव्हलपरची वेबसाईट बघावी
- अॅपला कोणतीही परवानगी देताना विचार करावा. गरज नसल्यास परवानगी नाकारावी.