नवी दिल्ली: व्हॉटसअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. एका इस्रायलच्या स्पायवेअरच्या मदतीने अनेक देशांमधील अधिकारी, पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ते यांचे फोन हॅक करण्यात आल्याचं समोर आले होते. यानंतर भारतात व्हॅाट्सअॅप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सची संख्या 80 टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे.
बिझनेस स्टॅडर्ड सॅन्सॅार टॅावर डाटाच्या दाव्यानूसार 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या काळात व्हॉट्सअॅप डाऊनलोड करणाऱ्या यूजर्सची संख्या जवळपास 80 लाखांहून अधिक होती. मात्र 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरच्या दरम्यान १० लाख लोकांनी व्हॉट्सअॅप डाऊनलोड केल्याचं सांगितलं आहे.
आम्ही आमचे हे स्पायवेअर फक्त सरकारे किंवा सरकारच्या अधिकृत गुप्तचर संस्थांनाच विकल्याचे इस्राएली कंपनी म्हणते. आम्ही या कंपनीकडून असे कोणतेही स्पायवेअर कधीही घेतलेले नाही, असे भारत सरकार म्हणते. मग ही हेरगिरी कोणाच्या इशाऱ्याने करण्यात येत होती, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
एकीकडे सायबर विश्वातील असा उपद्रव मुळात कुठून सुरु होतो याचा नेमका शोध घेण्याची पारदर्शी व्यवस्था असावी, अशी मागणी जोर धरत आहे. दुसरीकडे सोशल मीडियाचा दुरुपयोग रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे.