Infinix आपला पहिला 5G Smartphone नायजेरियात लाँच केला आहे. विशेष म्हणजे येत्या 14 फेब्रुवारीला भारतात देखील हा फोन येणार आहे, अशी माहिती कंपनीनं आधीच दिली आहे. जागतिक बाजारातील लाँचमुळे या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती मिळाली आहे. चला जाणून घेऊया Infinix Zero 5G ची संपूर्ण माहिती.
Infinix Zero 5G चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Zero 5G मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 500निट्स ब्राईटनेस आणि 1080 x 2460 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित एक्सओएस 10 वर चालतो.
प्रोसेसिंगसाठी इनफिनिक्स झिरो 5जी फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा डिमेनसिटी 900 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत वेगवान LPDDR5 RAM आणि लेटेस्ट UFS 3.1 storage देण्यात आली आहे. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. 3जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजीमुळे गरज पडल्यास एकूण 11GB रॅमची ताकद मिळू शकते.
Infinix Zero 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 30X zoom सह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर क्वॉड एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. हा 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर 27 दिवसांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.
Infinix Zero 5G ची किंमत
इनफिनिक्स झिरो 5जी फोनची किंमत नायजेरियामध्ये 169,500 नायरामध्ये उपलब्ध झाला आहे. ही किंमत 30,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. कंपनीनं या हँडसेटचे Cosmic Black, Horizon Blue आणि Skylight Orange कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.
हे देखील वाचा: