स्मार्टफोन ब्रँड Honor सध्या भारतात सक्रिय नसला तरी चीनमध्ये कंपनीनं धुमाकूळ घातला आहे. आज कंपनीनं Honor Play 6T आणि Honor Play 6T Pro असे दोन स्मार्टफोन चीनमध्ये सादर केले आहेत. यातील एक मोबाईल Apple iPhone 12 सारखा दिसतो. तसेच या फोन्समध्ये 10GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Honor Play 6T Pro चे स्पेसिफिकेशन्स
ऑनर प्ले 6टी प्रो मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट मिळतो. हे दोन्ही फोन अँड्रॉइड 12 आधारित मॅजिक युआय 5.0 वर चालतात. सोबत 8 जीबी रॅम सह 2 जीबी व्हर्च्युअल रॅम मिळून एकूण 10 जीबी रॅम मिळतो. कंपनीनं यात 128 जीबी स्टोरेज दिली आहे. फोटोग्राफीसाठी Honor Play 6T Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. फोनचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा सेंट आहे, तर सेकंडरी कॅमेऱ्याचं रिजोल्यूशन 2 मेगापिक्सल आहे. ऑनर प्ले 6टी प्रो मधील 4,000एमएएच बॅटरी 40वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Honor Play 6T
ऑनर प्ले 6टी मधील डिस्प्ले 6.74 इंचाचा असून 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. फोनमध्ये डिमेन्सिटी 700 चिपसेट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह देण्यात आला आहे. मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर आहे. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी 22.2 वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.
Honor Play 6T आणि 6T Pro ची किंमत
Honor Play 6T Pro च्या 8 जीबी रॅम व 128 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत 1399 युआन (जवळपास 16,600 रुपये) आहे. तर 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसाठी 1599 युआन (जवळपास 19,000 रुपये) मोजावे लागतील.
Honor Play 6T चा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल 1199 युआन (जवळपास 14,200 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8 जीबी रॅम व 256 जीबी मेमरीची किंमत 1399 युआन (जवळपास 16,600 रुपये) आहे.