विवो एका सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोनवर काम करत असल्याची बातमी गेल्या आठवड्यात आली होती. हा स्मार्टफोन कंपनीच्या ‘वी सीरीज’ अंतर्गत Vivo V23e नावाने लाँच केला जाणार आहे. Vivo V23e च्या एका व्हिडियोमधून या फोनच्या स्पेक्स, लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली होती. आता हा फोन बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर देखील लिस्ट झाला आहे.
Vivo V23e च्या बेंचमार्किंग साइट गीकबेंचवरील लिस्टिंगमधून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. या फोनचा मॉडेल नंबर Vivo V2116 आहे. तसेच या डिवाइसला सिंगल-कोर टेस्टमध्ये 473 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1668 स्कोर मिळाला आहे. इथे विवो वी23ई स्मार्टफोन अँड्रॉइड 11, मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट आणि 8GB RAM सह लिस्ट करण्यात आला आहे.
Vivo V23e चे स्पेसिफिकेशन्स
Vivo V23e 5G Phone मध्ये अँड्रॉइड 12 आधारीत फनटच 12 ओएस आहे. तसेच विवो फोनमधील 4030एमएएचची बॅटरी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केली जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर आलेल्या कॅमेरा सेटअप 64MP चा प्रायमरी रियर सेन्सर, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळेल. या फोनमधील 50MP Selfie कॅमेरा सेन्सर या फोनचा आकर्षण बिंदू ठरू शकतो.
हा फोन सर्वप्रथम व्हियेतनाममध्ये सादर केला जाईल. लीकनुसार हा फोन पुढील आठवड्यात दाखल होईल. तिथे या फोनची किंमत 10,000,000 VND असू शकते, असे सांगण्यात आले आहे. ही किंमत भारतीय चलनात 32,000 रुपयांच्या आसपास आहे.